माळेगाव - माळेगाव (ता. बारामती) कारखाना निवडणूकीत मातंबर नेते मंडळींबरोबर आज युवा नेते योगेश जगताप आदींनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. व बारामती निवडणूक कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. विद्यमान अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप, माजी अध्यक्ष बाळासाहेब तावरे, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा योगिता कोकरे, कार्यकर्ते प्रशांत सातव, अनिल तावरे, संग्रामसिंह देवकाते आदींनी उमेदवारी जाहीर करीत अर्ज दाखल केले.