esakal | पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातुन तरुणावर कोयत्याने वार, तर दोघांना जबर मारहाण
sakal

बोलून बातमी शोधा

Beating

पोलिसांकडे तक्रार केल्याच्या रागातुन तरुणावर कोयत्याने वार, तर दोघांना जबर मारहाण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - किरकोळ भांडणाची (Fighting) पोलिसात तक्रार (Police Complaint) दिल्याच्या रागातुन तिघांनी तरुणावर (Youth) कोयत्याने वार (Attack) केले. या घटनेत तरुण गंभीर जखमी (Injured) झाला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी (Police) दोघांना अटक (Arrested) केली आहे. ही घटना बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास रामटेकडी येथे घडला. (Youth Attacked police complete Beaten Crime)

शुभम कांबळे (वय 19), अजय उकीरडे (वय 30,रा. दोघेही रा.रामटेकडी. हडपसर) अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विकास चव्हाण (वय 25, रा. रामटेकडी) यांनी फिर्यादी दिली आहे. त्यानुसार कांबळे, उकीरडेसह एका अल्पवयीन मुलाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा: पुण्यात कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी 'जुगाड ऍम्ब्युलन्स' संकल्पना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी विकास चव्हाण व शुभम, अजय यांच्यात बुधवारी दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास किरकोळ कारणावरून भांडणे झाली होती. त्यावेळी संशयित आरोपींनी त्यांच्या घरावर दगड फेकून मारला होता. तो दगड फिर्यादींच्या आईच्या हाताला लागला होता. त्यामुळे त्यांनी पोलिसात वानवडी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. दरम्यान विकास, त्याचा भाऊ आकाश व मामा नितीन नवगिरे असे तिघेजण दुचाकीवरुन झिपरे रुग्णालयाकडे जात होते.

त्यावेळी आरोपींनी "तु आमच्या विरोधात पोलिसांत तक्रार करतो का, आता तुला खल्लास करतो' असे म्हणत फिर्यादीच्या भावाला हाताने मारहाण केली. तर फिर्यादी विकासच्या डोक्‍यात कोयत्याने वार करून त्यास गंभीर जखमी केले. तसेच त्यास जीवे मारण्याची धमकीही दिली. यावेळी फिर्यादीचे मामा नवगिरे यांनी भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी केली. त्यावेळी त्यांनाही शिवीगाळ करत आरोपींनी "आम्ही रामटेकडीचे दादा आहोत, जो कोणी आमच्या नादाला लागेल, त्याला आम्ही खल्लास करू' असे जोरजोरात ओरडून हातातील कोयता हवेत फिरवून दहशत निर्माण केली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक भुषण पोटावडे करीत आहेत.

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा