कबुतराची अंडी खाऊन तरुणाची आत्महत्या

अन्वर मोमीन
बुधवार, 19 डिसेंबर 2018

वडगाव शेरी (पुणे) : दारूच्या नशेत कबुतराच्या अंड्याचे ऑम्लेट बनवून आणि ते खाऊन एका तरूणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना लोहगाव येथे घडली.

वडगाव शेरी (पुणे) : दारूच्या नशेत कबुतराच्या अंड्याचे ऑम्लेट बनवून आणि ते खाऊन एका तरूणाने इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना लोहगाव येथे घडली.

याबाबत विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव अर्णव मुखोपाध्याय (वय 32, रा. गीवी विलीना, लोहगाव) असे आहे. अर्णव त्याच्या पत्नीसोबत गीवी विलीना सोसायटीच्या आठव्या मजल्यावरील सदनिकेत राहत होता. काल (ता. 18) सायंकाळी तो आणि त्याची पत्नी दोघे घरी होते. त्यावेळी अर्णवने दारू पिण्यास सुरवात केली. दारूची नशा केल्यावर त्याचे लक्ष त्याच्या सदनिकेतील कबुतराने बनवलेल्या घरट्याकडे गेले. त्यात कबुतराने अंडी घातल्याचे त्याच्या लक्षात आले.

अर्णवने नशेत असताना कबुतराच्या घऱट्यातील आठ अंडी काढली. ती घेऊन तो किचनमध्ये आला. या अंड्याचे मला ऑमलेट बनवायचे आहे, असे म्हणून त्याने ती फोडली आणि स्वतःच ऑमलेट बनवून ते खाल्ले. हे करताना त्याच्या पत्नीने त्याला विरोध केला. परंतु त्याने तिचे ऐकले नाही. थोड्या वेळाने नशेतच तो विचित्र वागू व बोलू लागला. माझ्या अंगात कबुतराचे भूत आले आहे, असे म्हणून तो घरातच पळू लागला. पळत त्याने सदनिकेच्या गच्चीतून आठव्या मजल्यावरून उडी मारली. 

याविषयी विमानतळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक दिलीप शिंदे म्हणाले, की अर्णव हा मूळचा कोलकत्याचा आहे. तो पुण्यात व्होडाफोन कंपनीत काम करतो. त्याला अपत्य नाही. आठव्या मजल्यावरून उडी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. अर्णवने आत्महत्या केल्याची नोंद पोलिसांनी केली आहे.

Web Title: Youth Committed suicide after Eggs Eat in Pune