पुणे : औंध येथे गळफास घेऊन तरूणाची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मे 2019

- 19 वर्षीय तरुणाने घेतला गळफास

औंध : येथील डीपी रस्त्यावरील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीमधील अतुल रामलींग शिंदे (वय 19 वर्ष) या तरूणाने काल रात्री राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळी उघडकीस आली.

अतुल शिंदे हा काल रात्री घराच्या वरच्या मजल्यावर एकटा झोपायला गेला होता. मात्र, सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. त्यानंतर कुटुंबीयांसह वसाहतीतील नागरिक औंध पोलिस चौकीत हजर झाले असून, तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth committed Suicide with Hanging in Pune