युवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या कोठडीत वाढ
युवा काँग्रेस कार्यकर्त्यांच्या
कोठडीत वाढ
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. २५ ‘इंडिया एआय इम्पॅक्ट’ परिषदेत सदरे काढून आंदोलन केल्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवक काँग्रेसच्या पाच कार्यकर्त्यांच्या पोलिस कोठडीत जिल्हा न्याय दंडाधिकाऱ्यांनी चार दिवसांकरिता वाढ केली आहे. कृष्णा हरी, कुंदन यादव, अजय कुमार, नरसिंहा तसेच जितेंद्र यादव अशी या आरोपींची नावे आहेत. जितेंद्र याला मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून अटक करण्यात आली होती.
या पाचही आरोपींना युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय भानू चिब यांच्यासमोर बसवून चौकशी करावयाची असल्यामुळे पाच दिवसांची कोठडी दिली जावी, अशी विनंती पोलिसांनी केली होती. मात्र जिल्हा न्याय दंडाधिकारी मृदूल गुप्ता यांनी आरोपींना चार दिवसांची कोठडी दिली. चिब हे आंदोलनाचे सूत्रधार असून त्यांनी लॉजिस्टिक मदत केल्याचे सांगत पोलिसांनी त्यांनाही अटक केली होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

