सांगवीतील युवक काँग्रेसचे 'हे' आंदोलन वेधतेय नागरिकांचे लक्ष

रमेश मोरे
Thursday, 10 September 2020

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हास्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  'रोजगार दो' या अभियानाची सुरूवात केली.

जुनी सांगवी : चिंचवड विधानसभा युवक कॉंग्रेसच्या वतीने जुनी सांगवीत 'रोजगार दो',या अभियानाची सुरूवात करण्यात आली. हे अभियान नागरिकांचे लक्ष वेधत आहे. येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक पुतळ्यासमोर कार्यकर्त्यांच्या वतीने रोजगार दो चा फलक हाती घेवून सध्या संकटात असलेल्या बेरोजगार सर्वसामान्यांना न्याय द्या.अशी मागणी करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या हास्ते पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन  'रोजगार दो' या अभियानाची सुरूवात केली.

अपयशी मोदी सरकारमुळे बेरोजगारी वाढत चालली आहे युवकांना एकतर नोकरी मिळत नाही ज्यांच्या होत्या त्यांच्याही नोकरी गेल्या आहेत.यामुळे सरकाराने बेरोजगारांना आधार द्यावा.असे कुंदन कसबे यांनी बोलताना सांगितले.

याचबरोबर रोजगार दो या अभियानांस जनतेनी त्यांच्या प्रतिक्रिया व मिस कॉल देऊन प्रतिसाद द्यावा असे आवाहन करण्यात आले.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस सरचिटणीस मयुर जयस्वाल व शहर कार्यकारणी पदाधिका-यांच्या वतीने  तहसिलदार  यांना वाढत्या बेरोजगारी बाबत निवेदन देण्यात आले.

यावेळी पिंपरी चिंचवड शहर जिल्हा युवक काँग्रेसचे निरिक्षक अक्षय जैन, शहर सेवा दलाचे अध्यक्ष मकरध्वज यादव, युवक अध्यक्ष संदेश बोर्डे, जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस कुंदन कसबे, सोशल मिडिया प्रमुख तुषार पाटील, विशाल कसबे, रोहित शेळके, गणेश मानकर, नरेंद्र कसबे सनी कसबे, राजू खुडे, राम भोसले  अादी कार्यकर्ते उपस्थित होते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Sagar Diliprao Shelar)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youth Congress Movement in sangvi