

A youth was arrested after creating a ruckus, vandalising property and threatening police officers at Sahakarnagar Police Station while demanding his friend's release.
Sakal
पुणे : सहकारनगर पोलिसांनी अटक केलेल्या मित्राला सोडविण्यासाठी आलेल्या एका तरुणाने पोलिस ठाण्यात गोंधळ घालून पोलिस कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तरुणाने पोलिस ठाणे पेटवून देण्याची धमकी देऊन त्याने तोडफोड केली. ३० जुलैला दुपारी एकच्या सुमारास हा प्रकार घडला.