Tailbaila Trek : तैलबैला गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने खाली कोसळून तरुणाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

youth died after falling from broken Climbing Rope Tailbaila fort pune

Tailbaila Trek : तैलबैला गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने खाली कोसळून तरुणाचा मृत्यू

पिरंगूट : मुळशी तालुक्यातील तैलबैला गडावर आरोहण करताना रोप तुटल्याने २०० फूट खाली कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सोमनाथ बळीराम शिंदे ( वय २५ , रा.कात्रज , पुणे . मूळ गाव शिंदफळ , ता . तुळजापूर , जी. उस्मानाबाद. ) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. आज सकाळी साडे नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , मयत सोमनाथ हा काल त्याच्या नऊ तरुणांसह टेलबैल गडावर आरोहनसाठी गेले होते.

आज सकाळी सोमनाथ हा गडावर पुढे जाऊन रोप , दोर बांधण्याचे काम करीत होता. त्याच्या पाठीमागून दोराच्या साह्याने उर्वरित तरुण गडावर चढाई करणार होते. आज सकाळी साडे नऊ वाजता दोर तुटल्याने सोमनाथ खाली १०० फूट कोसळला त्यानंतर तेथून पुन्हा १०० फूट आणखी खाली कोसळला. त्यामुळे २०० फूट खाली कोसळल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. सोमनाथ हा गरुडझेप मोहिमेतील सदस्य होता.

टॅग्स :Pune NewspuneYouthFort