तळेगाव ढमढेरे - निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील कामिनी ओढ्यातील पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या ३० वर्षीय युवकाचा मृतदेह अखेर तिसऱ्या दिवशी शोध पथकाला सापडला आहे. .सुरज अशोक राजगुरू (वय-३०, (सध्या राहणार निमगाव म्हाळुंगी, मूळ तळवडे, पिंपरी चिंचवड) या पुरातील पाण्यात वाहून गेलेल्या युवकाचा मृतदेह बुधवारी सकाळी शोध पथकाला सापडला आहे..पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अग्निशमन सेवा पथक, शिक्रापूर पोलिसांची दोन पथके, आपदा मित्र पथक, दौलत शितोळे मित्र मंडळ आणि ग्रामस्थ यांच्या मदतीने गेले तीन दिवस कामिनी ओढ्यात बुडालेल्या सुरजचा शोध चालू होता. अखेर सर्व शोध पथकाला यश मिळाले असून सुरज चा मृतदेह शोध पथकाला सापडला आहे..पुणे महानगर विकास प्राधिकरण अग्निशमन दलाचे अधिकारी उमेश फाळके, प्रशांत अडसूळ, उमेश फडके, शुभम पोटे, सिद्धांत जाधव, विकास आडे, राजेश फुंदे, दिग्विजय नलावडे तसेच दौलत शितोळे मित्र मंडळ, पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर साळुंखे, संदीप कारंडे, संदीप इथापे, अमोल चव्हाण, ग्रामपंचायत अधिकारी गुलाब नवले, तलाठी आबासाहेब रुके, पोलीस पाटील किरण काळे, आपदाचे वैभव निकाळजे, महेश साबळे, शेरखान शेख, अमोल कुसाळकर, शुभम वाघ, राहुल गायकवाड व ग्रामस्थ यांच्या मदतीने पाण्यातील सुरज राजगुरूचा मृतदेह काढण्यात आला..दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी सभापती मंगलदास बांदल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या रेखा बांदल, मनीषा कटके, तहसीलदार बाळासाहेब म्हस्के आदींनी घटनास्थळी भेट दिली.आपदा मित्र व अग्निशमन दलाने सुरज राजगुरु या युवकाचा मृतदेह अथक प्रयत्नाने पाण्यातून बाहेर काढला असून, यासंदर्भात कैलास राजगुरू यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात खबर दिली आहे..शिक्रापूर येथील शासकीय रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात सुरजचा मृतदेह देण्यात आला. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस हवालदार संदीप इथापे हे करत आहे..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.