भेलके महाविद्यालयाचे पालखुर्द येथे शिबिर
नसरापूर, ता. २४ ः नसरापूर येथील शंकरराव भेलके महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष शिबिर पालखुर्द (ता. राजगड) येथे झाले. शिबिरात विद्यार्थ्यांनी ग्रामस्थांसह विविध समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना विभाग व पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे शंकरराव भेलके महाविद्यालय, नसरापूर यांच्या वतीने “शाश्वत विकासासाठी युवक–पाणलोट क्षेत्र व पडीक जमिनी व्यवस्थापन” या विषयांतर्गत 13 ते 19 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष शिबिर पालखुर्द गावात आयोजित केले होते.
या शिबिरामध्ये स्वयंसेवकांनी श्रमदानासह विविध समाजोपयोगी व पर्यावरणपूरक उपक्रम राबवले. गाव स्वच्छता मोहीम, राजगड किल्ला परिसराची स्वच्छता, प्लास्टिक कचरा संकलन, गुंजवणी नदीवर वनराई बंधारा उभारणी, पडीक जमिनी व्यवस्थापन, प्रभात फेरीद्वारे जनजागृती, पथनाट्य सादरीकरण, कृषी पर्यटन, क्षेत्र भेट तसेच विविध विषयांवरील व्याख्याने आयोजित करण्यात आली.
शिबिरादरम्यान शाश्वत शेती, राष्ट्रनिर्मितीत युवकांची भूमिका, लेह ते लडाख प्रवास अनुभव, नंदनवन कृषी पर्यटन आणि राजगड किल्ला संवर्धन यासारख्या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. संक्रांतीच्या दिवशी गावातील महिलांसाठी हळदीकुंकू कार्यक्रम घेण्यात आला. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांद्वारे ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. पोलिस पाटील योगेश दरडीघे, शिवाजी दरडीघे, पांडुरंग दरडीघे यांनी या शिबिरासाठी विशेष मदत केली.
शिबिराचे उद्घाटन विंझर येथील अमृतेश्वर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजीव लाटे यांनी केले. तर समारोपास सरपंच निता खाटपे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाधिकारी डॉ. जगदीश शेवते, प्रा. दयानंद जाधवर, प्रा. वैष्णवी कोंडे व प्रा. अंकिता महांगरे, अभिषेक मोरे तसेच सर्व प्राध्यापक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी हे शिबिर यशस्वीपणे पार पाडले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

