killed
sakal
इंदापूर - अनैतिक संबंधाच्या संशयातून निमगाव केतकी (ता. इंदापूर) येथे सणसर येथील 29 वर्षीय युवकाला लाकडी दांडके व दगडाने बेदम मारहाण करून खून केल्याची घटना घडली. पुष्पराज मुरलीधर गायकवाड असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी स्वप्नील भिमराव बारवकर आणि अशुतोष संजय भोंग (दोघेही रा. निमगाव केतकी, ता. इंदापूर) यांच्याविरोधात इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.