Youth Kidnapped
sakal
पुणे - एका २७ वर्षीय तरुणीने तरुणाशी बळजबरीने लग्न करण्यासाठी साथीदारांच्या मदतीने त्याचे भररस्त्यातून अपहरण केल्याची धक्कादायक घटना पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील पेट्रोल पंपाजवळ घडली. लोणीकंद पोलिस आणि गुन्हे शाखेने बीड पोलिसांच्या मदतीने माजलगाव येथून तरुणीसह सात आरोपींना ताब्यात घेतले. पोलिसांनी अपहृत तरुणाची सुखरूप सुटका केली आहे.