

Accident
sakal
पुणे - महंमदवाडी येथील रेहेजा विस्टा परिसरात डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात २० वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेला तरुण गंभीर जखमी झाला. सोमवारी (ता. २१) सायंकाळी पाचच्या सुमारास महादेव मंदिराजवळ हा अपघात झाला.