

Accident
ESakal
बारामती - तालुक्यातील कन्हेरी नजिक पुलाजवळ महामार्गावर हायवा चालकाने अचानक लेन बदलल्याने झालेल्या अपघातात अर्जुन अनिल विटकर (वय-२६, रा. लिमटेक, ता. बारामती) या तरुणाचा मृत्यू झाला, तर त्याचा मित्र इंद्रजित विठ्ठल खंडाळे (रा. लिमटेक, ता. बारामती) गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर जखमींना कोणतीही मदत न करता हायवा चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.