आठ महिन्यापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

murder

बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आठ महिन्यानंतर उघडकीस आला.

आठ महिन्यापूर्वी बेपत्ता असलेल्या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून

वडगाव निंबाळकर - बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर येथून बेपत्ता असलेल्या तरुणाचा खून झाल्याचा प्रकार आठ महिन्यानंतर उघडकीस आला. अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रोहित खोमणे, सागर चव्हाण, शिवदत्त सूर्यवंशी रा. वडगाव निंबाळकर ता बारामती अशी या खून प्रकरणात ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे आहेत. फेब्रुवारी २०२२ मध्ये येथिल विवाहित तरूण बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबियांकडून पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. वडगाव निंबाळकर पोलिस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणाचा समांतर तपास सुरु कऱण्यात आला होता.

बेपत्ता तरूणाचा मृतदेह लोणंद (ता. खंडाळा, जि. सातारा) पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिळाला होता. त्यानंतर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संबंधित महिलेच्या प्रियकरासह अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे. या प्रियकराने तिच्या पतीचा खून केल्याची कबुली दिली आहे. वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात या प्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. अनैतिक संबंधातून झालेल्या या खून प्रकरणामुळे वडगाव परिसरात खळबळ उडाली आहे.