युवकांचा सहभाग आवश्यक
युवकांचा सहभाग आवश्यक sakal

सहकारातून समृद्धीसाठी युवकांचा सहभाग आवश्यक

विद्याधर अनास्कर यांचे प्रतिपादन; ३६ व्या राष्ट्रीय संशोधन परिषदेचे आयोजन
Published on

पुणे : सहकारातून समृद्धीकडे हे तत्त्व प्रत्येक क्षेत्रात अस्तित्वात आणण्यासाठी युवकांचा अधिकाधिक सहभाग असला पाहिजे. सर्व क्षेत्रांचा विकास गतीने झाला, तरच समाजाचा विकास होईल. यादृष्टीने सहकार क्षेत्र ही आजच्या काळाची गरज बनली आहे, असे मत महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) विद्याधर अनास्कर यांनी व्यक्त केले.इंडियन सोसायटी फॉर स्टडिज इन को-ऑपरेशन (आयएसएससी) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित ३६ व्या राष्ट्रीय संशोधन परिषदेत ते बोलत होते. परिषदेचे उद्घाटन भारतीय राष्ट्रीय सहकार परिषदेचे अध्यक्ष दिलीप संघानी यांच्या हस्ते झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, माजी सनदी अधिकारी डॉ.एस.के.गोयल, आयएसएससीचे अध्यक्ष जी.एच.अमीन, वैकुंठ मेहता नॅशनल इन्स्टिट्यूटच्या संचालिका डॉ. हेमा यादव, आयएसएससीचे मानद सचिव प्रा. अनिल कारंजकर, अ‍ॅड. सुभाष मोहिते, अ‍ॅड. जयंत कुलकर्णी, प्रा.डॉ. मुकुंद तापकीर, संजीव खडके आदी या वेळी उपस्थित होते.

 युवकांचा सहभाग आवश्यक
दरोडाेखाेरांना जेलबंदी करण्यास आळेफाटा पोलीसांना यश

अनास्कर म्हणाले, एकाच प्रकारचे ध्येय असणाऱ्या व्यक्ती विकासासाठी प्रयत्न करतात, हे सहकार क्षेत्राचे मूलतत्त्व आहे. परंतु सहकारातून वैयक्तिक समृद्धीकडे जाणाऱ्यांची संख्याही वाढत आहे. अशा वैयक्तिक लाभ घेण्यासाठी येणाऱ्यांना सहकार क्षेत्राचे दरवाजे बंद केले पाहिजेत. संघानी म्हणाले, सहकार क्षेत्राचे देशाच्या विकासात मोठे योगदान आहे. परंतु सहकार पाया मजबूत करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांत योग्य पावले उचलली नाहीत. सहकार क्षेत्र मजबूत झाले तरच विकास गतीने होइल.

डॉ. करमळकर म्हणाले, युवकांचे सहकार क्षेत्रामध्ये योगदान वाढण्यासाठी विद्यापीठ प्रयत्न करीत आहे. त्यासाठी सहकार विषयक उपक्रम आणि सहकार अभ्यासक्रम विद्यापीठांमध्ये शिकवला जाणार आहे. हेमा यादव म्हणाल्या, सहकाराच्या माध्यमातून समाज एकत्र येऊन अधिक गतीने विकास होऊ शकतो. युवकांना सहकार क्षेत्राची गोडी निर्माण करणे ही सहकार क्षेत्राची जबाबदारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com