महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास १ वर्षांच्या कैदेची शिक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nitin Tapare

महिलेचा विनयभंग केल्याबद्दल टापरेवाडी-माधवनगर (ता. भोर) येथील तरुणास भोरच्या न्यायालयाने एक वर्षांच्या कैदेची आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.

Crime News : महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी तरुणास १ वर्षांच्या कैदेची शिक्षा

भोर - महिलेचा विनयभंग केल्याबद्दल टापरेवाडी-माधवनगर (ता. भोर) येथील तरुणास भोरच्या न्यायालयाने एक वर्षांच्या कैदेची आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. टापरेवाडी येथील निखील उर्फ नितीन रामचंद्र टापरे असे शिक्षा झालेल्या तरुणाचे नाव असून त्याने गावातील महिलेचा नोव्हेंबर २०१८ मध्ये विनयभंग केला होता.

भोरच्या दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या प्रथमवर्ग न्यायाधीश श्रीमती एच. यू. यू. सरनायक यांनी बुधवारी (ता. २३) याबाबतचा आदेश दिला. गुन्हा दाखल झाल्यानंतर राजगड पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रवींद्र कुलकर्णी यांचे त्याच्याविरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले. सरकारी वकील श्रीमती व्ही. एस पवार यांनी सरकारच्या वतीने काम पाहिले. राजगडचे पोलिस निरीक्षक सचीन पाटील, पोलिस हवालदार विठ्ठल महांगरे व दिपक धुमाळ यांनी तपासाकामी सहकार्य केले.