JP Nadda : भारताला विकसित देश बनविण्यात तरूणांनी योगदान द्यावे

देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे.
JP Nadda
JP Naddasakal

पुणे - ‘भारत हा विकसनशील देश असल्याचे म्हणवून घेण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह केंद्र सरकार समाधानी नाही. तर भारताने आता विकसनशील देशाकडून विकसित देश होण्याकडे वाटचाल केली आहे. या वाटचालीत देशातील तरुणांचे योगदान महत्त्वपूर्ण असणार आहे. आगामी काळात युवकांनी देशाला ‘विकसित देश’ बनविण्यासाठी आपले योगदान द्यावे,’ असा सल्ला भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी दिला.

देशाच्या स्वातंत्र्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानंतर ‘मेरी माटी, मेरा देश’ हे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना आणि नेहरू युवा केंद्र संघटन यांच्या वतीने राज्यातील २२ विद्यापीठांनी गावा-गावामधून गोळा केलेली माती अमृत कलशात संकलित करण्यात आली. हा कार्यक्रम नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.

यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे, आमदार माधुरी मिसाळ, ‘एनएसएस’ राज्य सल्लागार राजेश पांडे, वीरपत्नी साधना ओझरकर यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

नड्डा म्हणाले,‘‘चांद्रयान-३ मोहिमेच्या यशानंतर ही मोहीम आधीच्या सरकारच्या काळातील होती, असे बोलले जाते. पण भारतीय अवकाश संशोधन संस्थेला चांद्रयान ३ या मोहिमेसाठी आर्थिक पाठिंबा देण्याचे, प्रोत्साहन देण्याचे काम आमच्या सरकारने केले आहे.

याशिवाय केंद्र सरकारने ‘जी २०’ परिषदेत देशातील विविध शहरांमध्ये तब्बल दोनशे बैठका घेतल्या, त्यामुळे देशाच्या वैविध्य, संस्कृतीचे दर्शन पाहुण्यांना घडले. गेल्या २७ वर्षांपासून प्रलंबित असणारे महिला आरक्षण विधेयक सरकारने संसदेत आणले आणि लोकसभा आणि राज्यसभेत ते सर्वानुमते मान्य झाले. जागतिक पातळीवर आर्थिक स्थितीत आपण ब्रिटनला मागे टाकत जगातील पाच देशांच्या यादी स्थान मिळविले आहे.

ॲटोमोबाईलच्या क्षेत्रातील जपानला मागे टाकत भारत जगातील तिसऱ्या क्रमांची सर्वात मोठे केंद्र बनले. तसेच बाहेरील देशातून भारतात मोबाईल मागविण्यात येत होते. परंतु आज देशात ९७ टक्के मोबाईलचे उत्पादन केले जाते. विकासाच्या दिशेने भारत वाटचाल करत आहे. यात तरूणांनी आपले योगदान द्यावे.’

या कार्यक्रमाला येण्यापूर्वी नड्डा यांनी संगमवाडी येथील लहुजी वस्ताद यांच्या समाधीस्थळी दर्शन घेऊन तेथील माती कलशामध्ये संकलित केली. पाटील  म्हणाले,‘‘या उपक्रमांतर्गत राज्यातील आपल्या घरातील मातीसह दोन कोटी सेल्फी काढण्याचा विश्व विक्रम करण्यात येणार आहे. त्यातील ५० लाख सेल्फीचे उद्दिष्ट उच्च व तंत्र शिक्षण विभाग पूर्ण करेल. राज्यातून दहा हजार कलश दिल्लीत पाठविले जाणार आहेत.’

तर बावनकुळे यांनीही मनोगत व्यक्त केले. पांडे यांनी ‘मेरी माटी, मेरा देश’ अभियानांतर्गत सेल्फी काढण्याचा विश्व विक्रम गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात येणार असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संजय चाकणे यांनी केले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा पुण्यात आले असताना त्यांनी श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या उत्सव मंडपात गणपतीचे दर्शन घेतले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com