Khadki Crime : तरुणाचा खून करून मृतदेह जाळला, आरोपीला अटक

खडकी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली.
murder
murdersakal

पुणे - खडकी परिसरात एका तरुणाचा खून करून मृतदेह जाळून टाकल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी आरोपीला २४ तासांत धानोरी परिसरातून अटक केली आहे. पूर्ववैमनस्यातून आणि अनैतिक संबंधातून हा खून करण्यात आल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.

विजय राजू धोत्रे (वय ३३, रा. बॉम्बे सॅपर्सजवळ, येरवडा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर सुधीर साहेबराव जाधव (वय ३२, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवीन खडकी पुलाखाली मुळा नदीच्या पात्रात जलपर्णीमध्ये अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. त्याचा खून करून मृतदेह जाळल्याचे दिसून आले. रविवारी (ता. १७) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. याबाबत खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

अतिरिक्त पोलिस आयुक्त मनोज पाटील आणि पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी या गुन्ह्याचा तपास करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार खडकीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गिरीश दिघावकर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) उत्तम भजनावळे यांच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी केली. याठिकाणी एक चिठ्ठी आढळून आली.

शिवाय, मृत तरुणाच्या कपड्यांच्या तुकड्यांच्या आधारे तरुणाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी खडकी परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. पोलिस उपायुक्त मगर यांनी चतु:शृंगी, विश्रांतवाडी आणि येरवडा पोलिस ठाण्यातील अधिकाऱ्यांची तपास पथके तयार केली. मृत तरुण येरवडा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

नातेवाइकांना भेटल्यानंतर मृत तरुणाच्या पायाला झालेल्या जुन्या जखमेवरून त्याची ओळख पटली. दरम्यान, पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण आणि खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपी सुधीर जाधव याला ताब्यात घेतले. त्याच्या इतर साथीदाराचा शोध घेण्यात येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com