सातारा फुले समृद्ध गाव’ उपक्रमाचा कुलगुरुकडून आढावा

सातारा फुले समृद्ध गाव’ उपक्रमाचा कुलगुरुकडून आढावा
Published on

तरुण, महिलांचा शेतीतील सहभाग वाढवा

कुलगुरू डॉ. विलास खर्चे ः चिंचनेर (निंब) गावाच्या प्रत्यक्ष भेटीत घेतला आढावा

ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : हवामान बदलाचे संकट, मजुरांची टंचाई आणि शेतीमाल प्रक्रियेची गरज ओळखून तरुण व महिलांचा शेतीतील सहभाग वाढवावा. जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी एकत्रित येऊन काम केल्यास चिंचनेर निंब हे गाव जिल्ह्यासाठी शेती विकासाचे रोल मॉडेल बनेल, असा विश्वास कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी व्यक्त केला.
कृषी विद्यापीठाचे विकसित तंत्रज्ञान तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून ग्रामीण शेती व्यवस्था समृद्ध करण्याच्या उद्देशाने राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास खर्चे यांनी ‘फुले समृद्ध गाव’ योजनेअंतर्गत निवड झालेल्या चिंचनेर (निंब) गावाला प्रत्यक्ष भेट देऊन विविध विकासकामांचा आणि उपक्रमांचा सविस्तर आढावा घेतला.
आयोजित शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात डॉ. खर्चे बोलत होते. या वेळी गावातील शेतकरी व महिला गटांच्या बीजोत्पादन उपक्रमाची पाहणी करत विद्यापीठाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
या प्रसंगी विस्तार शिक्षण संचालक डॉ. गोरक्ष ससाणे यांनी शेतकऱ्यांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान पोहोचवण्यातील अडचणी दूर करण्यावर मार्गदर्शन केले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी शेतीत कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा स्वीकार काळाची गरज असल्याचे सांगितले. ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अजय शेंडे यांनी नैसर्गिक व सेंद्रिय शेती योजनेत मिळणाऱ्या सहकार्याचा उल्लेख केला. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस तज्ज्ञ डॉ. राजेंद्र भिलारे यांनी नवीन वाणांविषयी माहिती दिली, तर बारामतीचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. जितेंद्र कदम यांनी कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सहभागाबाबत स्पष्टीकरण दिले.
प्रारंभी कृषी विज्ञान केंद्र बोरगावचे प्रमुख डॉ. महेश बाबर यांनी प्रास्ताविकात समृद्ध गाव संकल्पनेची उद्दिष्टे व भावी योजना मांडल्या. या कार्यक्रमास सरपंच जयंत जाधव, उपसरपंच रूपाली डांगे, विकास सोसायटी अध्यक्ष नागसेन गडांकुश, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष प्रशांत शिंगटे यांच्यासह परिसरातील प्रगतशील शेतकरी व ग्रामस्थ उपस्थित होते.
-----
४१८००
फोटो ओळी ----
चिंचनेर (निंब), जि. सातारा ः येथे शेतकरी-शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रमात मार्गदर्शन करताना डॉ. विलास खर्चे त्यावेळी मान्यवर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com