जुन्नर - नाणेघाटाजवळील बाराशे फूट खोल दरीत अंजनावळे (लव्हाळी) ता.जुन्नर येथील नवनाथ रामदास कोकणे (वय-२७) ह्या बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे.
मृत नवनाथ रविवारी ता. १५ रोजी दुपार पासून नाणेघाट येथून बेपत्ता होता. त्याचा शोध घेण्यात येत होता. येथील सुमारे बाराशे फूट खोल दरीत (सोमवारी ता. १६) मृतदेह मिळून आला. जुन्नर येथील शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी मृतदेह वर आणण्याचा प्रयत्न केला.