Malegaon Statement
sakal
माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखाना प्रशासनाने सालाबाद प्रमाणे यंदाही दोनशे रुपये प्रतिटन खोडकी (कांडे) पमेंट जाहीर करावे,अशी मागणी आज राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी एक निवेदनाद्वारे केली. जून महिन्यामध्ये नवीन ऊस लागवड करण्याकामी व शैक्षणिक वर्षाच्या सुरवातीला प्रतिटन दोनशे रुपये खोडकी पमेंट देण्याची माळेगावची परंपरा आहे, याकडेही युगेंद्र पवार यांनी लक्ष वेधले.