yugendra pawar and sunetra pawar
sakal
बारामती - येथील श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने पॅनेल देऊन पूर्ण ताकदीनिशी निवडणूक लढविणार असल्याची माहिती विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी दिली.
सोमेश्वर कारखान्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पवार विरुध्द पवार अशी लढत बारामतीत पुन्हा पाहायला मिळेल, अशी चिन्हे आहेत. बारामतीत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सोमेश्वरची निवडणूक लढविणार असल्याचे सोमवारी (ता. 7) जाहीर केले. पक्षाचे अनेक पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.