वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी युवासेनेने घ्यावी

शहर शिवसेनेच्या वतीने एक दिवसाचे अधिवेशन खडकवासला परिसरात आयोजित केले होते.
वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी युवासेनेने घ्यावी

खडकवासला : "शिवसेनेचा वैद्यकीय मदत कक्ष चार वर्षांपूर्वी सुरू झाला. कोरोना काळात आणि त्यानंतर ही या कक्षाच्या वतीने प्रभावीपणे काम सुरू आहे. विधानसभा पातळीवर नागरिकांना वैद्यकीय मदत मिळवून देण्याची जबाबदारी पुणे शहर युवासेनेने घ्यावी." असे आवाहन युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी केले.

शहर युवासेनेच्या वतीने एक दिवसाचे अधिवेशन खडकवासला परिसरात आयोजित केले होते. यावेळी सरदेसाई बोलत होते. शिवसेनेचे सचिव सूरज चव्हाण, शिवसेना उपनेते प्रा.नितीन बानगुडे पाटील, शिवसेनेचे सह संपर्क प्रमुख आदित्य शिरोडकर, अमोल किर्तीकर मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य साईनाथ दुर्गे, जसप्रीत सिंग यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, शहरप्रमुख गजानन थरकुडे, संजय मोरे, नितीन वाघ, सचिन पासलकर, अविनाश बलकवडे, रुपेश पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना कार्यकारणी सदस्य व शहर विस्तारक रुपेश कदम, विधानसभा प्रमुख कुणाल धनवडे, राम थरकुडे, दशरथ खिरीड, सनी गवते, निरंजन दाभेकर , चेतन चव्हाण, मयूर पवार, *यांच्यासह विस्तारक कल्पेश यादव, राजेश पळसकर, किरण साळी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

"स्वयंसेवी संस्था विविध क्षेत्रात वेगवेगळे उपक्रम राबवितात. प्रभागात त्यांचे उपक्रम राबवून नागरिकांना मदत होईल. असे सांगून सरदेसाई म्हणाले, यूपीएससी, एमपीएससीच्या परीक्षेची शिकवणी, अभ्यासासाठी अनेक युवक विद्यार्थी शहर परिसरात राहतात. त्यांचे प्रश्न समस्या असतात. त्या सोडवण्यासाठी महाविद्यालय स्तराप्रमाणे युवासेनेच्या शाखा आहेत. त्याप्रमाणे वसतीगृह शाखा किंवा कक्ष सुरु करावा.

चव्हाण म्हणाले, दर एक दोन वर्षांनी कोणती ना कोणती तरी निवडणुका असतात. या निवडणुकीत विजयासाठी पक्ष संघटना मजबूत केली पाहिजे. राज्य सरकारने घेतलेले निर्णय माहिती नागरिकांच्या पर्यंत मोठी जबाबदारी युवासेनेची आहे.

शिरोडकर म्हणाले, पुणे सांस्कृतिक राजधानी आहे. क्रीडा विद्यापीठ या ठिकाणी सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर या दोन्ही क्षेत्रांमध्ये काम करण्याची मोठी संधी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांना आहे. यूपीएससी एमपीएससी बाबतीत मार्गदर्शन युवासेनेच्या माध्यमातून केले जात आहे. याबाबतची तयार नववी पासून सुरू करावी. लवकर सुरुवात केली तर त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल.

छत्रपती शिवाजीमहाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांनी हिंदवी स्वराज्य उभे करण्यासाठी संघटन कौशल्य कसे होते. मावळे कसे जोडले. यावर प्रा.बानुगुडे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

राज्यातील महाराष्ट्र विकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनेक जनहिताचे निर्णय घेत आहेत. ते सामान्य नागरिकांच्या पर्यंत पोचवण्याची जबाबदारी आहे. त्या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी हे एक दिवसाचे अधिवेशन घेण्यात आले असे आयोजक शहर संपर्क प्रमुख रुपेश कदम यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com