
कात्रज - राष्ट्रीय एकात्मतेला बळ देणाऱ्या मानवता प्रतिष्ठानच्या मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात (Marriage) हिंदू मुस्लिम (Hindu Muslim) ऐक्याची नव्याने मुहुर्तमेढ रोवली गेली आहे. धर्मभेद टाळून देश जोडण्याचे काम नवी पिढीच करू शकते त्यासाठी कोणीतरी पुढं आलं पाहिजे असा आत्मविश्वास बाळगून संतोषनगर, कात्रजमधील युवराज मोरे (Yuvraj More) आणि खडकी येथिल मरियम शेख (Mariyam Shaikh) यांचा नुकताच विवाह पार पडला. (Yuvraj More and Mariyam Shaikh Hindu Muslim Marriage)
मनं जुळली अन् युवराज आणि मरियमने विवाह करण्याचा धाडशी निर्णय केला. दोघांनी आपापल्या कुटुंबियांना विश्वासात घेण्याचा प्रयत्न केला त्याला चार महिन्यांनी यश आले. जातीधर्माच्या भिंती पार करून युवराज आणि मरियम विवाहबद्ध झाले. सामाजिक व धार्मिक ऐक्य हाच राष्ट्रीय एकात्मतेचा पाया आहे. तो पाया भक्कम करण्यासाठी आणि सर्वच जाती धर्मातील गोरगरीब कुटुंबातील मुलामुलींचे विवाह विनासायास व्हावेत यासाठी मानवता प्रतिष्ठानने पुढाकार घेतला आहे. यासाठी विकासनाना फाटे मित्र परिवार, साईनाथ मित्र मंडळ आणि यंत्रनिर्माण पतसंस्था आयोजित मोफत सर्वधर्मीय विवाह सोहळ्यात युवराज आणि मरियमने हिंदू मुस्लिम ऐक्याची मुहुर्तमेढ रोवली. जांभूळवाडीचे माजी उपसरपंच मदन जांभळे, अंकुश बागल यावेळी उपस्थित होते.
कात्रज येथील काशी विश्वेश्वर मंगल कार्यालयात दोन महिन्यांपासून रोज एक याप्रमाणे सर्वधर्मीय विवाह पार पडत आहेत. या उपक्रमात सर्व जातीधर्मीय विवाह पार पडले आहेत. त्यात हिंदू मुस्लिम धर्मांना जोडणारा पहिला आंतरधर्मीय विवाह पार पडला आणि मानवता प्रतिष्ठानचा राष्ट्रीय एकात्मता बळकट करण्याचा उद्देश सफल झाला. संयोजक विकास फाटे म्हणाले, मानवता प्रतिष्ठानच्या मानवजोड अभियानाचा भाग म्हणून सर्वधर्मीय मोफत विवाह सोहळयाला मिळालेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. गरीबीला धर्म नसतो. गरीबी सर्व धर्मांत आहे. मर्यादीत उपस्थितीत, आटोपशीर कमी खर्चात लग्न सोहळ्याची शिस्त सर्व समाजाला लावताना राष्ट्रीय एकात्मतेला बळ देण्याचा आमचा प्रयत्न यशस्वी होतोय. या उपक्रमासाठी मानवता प्रतिष्ठानचे शंकर निंबाळकर, प्रशांत फाटे, माऊली कुंभार, संदीप आवारे, विनितेश फाटे, संकेत फाटे, योगेश फाटे, अथर्व फाटे, दत्ता सरोदे, अश्वथ फाटे हे सर्वजण परिश्रम घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.