पुण्यात तब्बल पावणेदोन वर्षानंतर काल शून्य कोरोना मृत्यूची नोंद

याआधी ३० मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे शून्य मृत्यू होते. त्यामुळे तेव्हापासून आजतागायत आज पहिल्यांदाच जिल्ह्यात कोरोनाचे शून्य मृत्यू नोंदले गेले आहेत.
corona death
corona deathesakal

पुणे : पुणे जिल्ह्यात (Pune District) सुमारे पावणेदोन वर्षाच्या कालखंडानंतर सोमवारी (ता. २०) कोरोनाने एकही मृत्यू (Corona Death) झाला नाही. याआधी ३० मार्च २०२० पर्यंत जिल्ह्यात कोरोनाचे शून्य मृत्यू होते. त्यामुळे तेव्हापासून आजतागायत काल पहिल्यांदाच जिल्ह्यात कोरोनाचे शून्य मृत्यू नोंदले गेले आहेत. दरम्यान, सोमवारी दिवसभरातील जिल्ह्यातील नवीन कोरोना रुग्णांची संख्या अवघी ९३ इतकी कमी नोंदली गेली आहे. यामध्ये पुणे शहरातील केवळ ३३ नवे रुग्ण आहेत.

सोमवारी दिवसभरात पुणे जिल्ह्यातील १५१ जणांनी कोरोनावर मात केली आहे. दिवसात पुणे शहरातील ३३ नवीन रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये ३४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात २० आणि नगरपालिका हद्दीत सहा नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात दिवसभरात एकही नवीन कोरोना रुग्ण आढळून आला नाही.

corona death
एसटी आंदोलक संपावर कायम; गुजर यांच्यावर आंदोलनकर्ते संतप्त

जिल्ह्यातील एकूण कोरोनामुक्तांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ७७ जण आहेत. पिंपरी चिंचवडमधील २५, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ३६, नगरपालिका हद्दीतील सहा आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील सहा जण कोरोनानुक्त झाले आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात एकूण १ हजार ८५४ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. जिल्ह्यातील एकूण सक्रिय रुग्णांपैकी शहर व जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये ५६९ जणांवर उपचार सुरु आहेत. उर्वरित १ हजार २८५ जण हे गृह विलगीकरणात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com