Katraj News : १० कोटींची मल्लनिस्सारण वाहिनी टाकूनही उपयोग शून्य! शेलारमळा ओढ्यातून मैला पाणी थेट कात्रज तलावात; दुर्गंधीने नागरिक बेजार

शेलारमळ्यातून कात्रज तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील नादुरुस्त मल्लनिस्सारण वाहिनीतून ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावात पाणी जात आहे.
Katraj – Sewage water from a stream in the Shelar Mala area is flowing directly into Katraj Lake.

Katraj – Sewage water from a stream in the Shelar Mala area is flowing directly into Katraj Lake.

sakal

Updated on: 

कात्रज - शेलारमळ्यातून कात्रज तलावाकडे जाणाऱ्या ओढ्यातील नादुरुस्त मल्लनिस्सारण वाहिनीतून ऐतिहासिक नानासाहेब पेशवे तलावात पाणी जात आहे. या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. सकाळी फेरीसाठी येणाऱ्या नागरिकांना आणि ओढा परिसरातील रहिवाशांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. २०२२ साली महापालिकेने टाकलेल्या मल्लनिस्सारण वाहिनीचा उपयोग शून्य होत असल्याचेही यानिमीत्ताने समोर आले आहे.

Loading content, please wait...