झेडपी शाळांचे 'पाऊल पडते पुढे'; आता विद्यार्थी गिरवणार ऑनलाइन धडे!

ZP_School_Students
ZP_School_Students
Updated on

पुणे : राज्यातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीही यंदापासून ऑनलाइन शिक्षणाचे धडे गिरवणार आहेत. यासाठी खासगी शाळांच्या धर्तीवर राज्य सरकार राज्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांसाठी खास अॅप विकसित करत आहे.

हे अॅप वापरण्यासाठी आवश्यक असलेल्या एंड्रॉयड मोबाइलची ग्रामीण भागातील पालकांकडे वाणवा आहे. त्यामुळे जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देण्यात मोठा अडसर निर्माण होणार आहे. 

याशिवाय हे अॅप कधीपासून कार्यान्वित होणार, जिल्हा परिषदेच्या शाळा केव्हापासून सुरू होणार, याबाबत अद्यापही राज्य सरकारने काहीही निर्णय घोषित केलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्व जिल्हा परिषदांचे लक्ष राज्य सरकारच्या निर्णयाकडे लागले आहे. या वृत्ताला पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष व शिक्षण सभापती रणजित शिवतरे यांनीही दुजोरा दिला आहे.

दरवर्षी १५ जूनला जिल्हा परिषद शाळांचे शैक्षणिक वर्ष सुरू होत असते. यंदा मात्र कोरोनामुळे राज्यात मागील दोन महिन्यांपासून लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे सरत्या शैक्षणिक वर्षाच्या वार्षिक परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. परंतु अद्यापही लॉकडाऊन सुरूच असून, ते ३० जूनपर्यंत कायम असणार आहे. यामुळे यंदाचे शैक्षणिक वर्ष नेमके केव्हा सुरू होणार, याबाबतचा संभ्रम कायम आहे. 

विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडू नये, या उद्देशाने ऑनलाइन धडे देण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी ऑनलाइन शिक्षण देणारे अ‍ॅप  विकसित करण्यात येत आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून जिल्हा स्तरावर मास्टर ट्रेनर निर्माण केले जाणार आहेत. हे मास्टर ट्रेनर तालुकास्तरावर जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांना प्रशिक्षण देऊन ऑनलाईन पाठयक्रमाचा अभ्यास पूर्ण करणार आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com