
पुणे : जिल्हा परिषद, पंचायत समितीची गट, गण रचना जाहीर झाल्यानंतर राजकीय घडामोडींना अधिक वेग आला आहे. राजकीय पक्षांनी पदाधिकाऱ्यांच्या तसेच इच्छुकांच्या बैठका घेण्यास सुरुवात केली आहे, तसेच गावोगावी आखाड पार्ट्या रंगू लागल्या आहेत. ज्या गटाची रचना बदलली, त्या काही गावातील इच्छुक आणि नागरिक एकत्र येऊन गट, गण रचनेवर हरकती नोंदवत आहेत. सोमवारी हरकती सूचना दाखल करण्याचा अखेरचा दिवस आहे.