Pune ZP Election : वीरधवल जगदाळे यांची उपाध्यक्षपदाची हुलकावणी, थेट अध्यक्षपदाला गवसणी

पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य वीरधवल कृष्णराव जगदाळे यांची बिनविरोध निवड झाली.
Pune zp chairman virdhawal jagdale

Pune zp chairman virdhawal jagdale

sakal

Updated on

दौंड - पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ सदस्य वीरधवल कृष्णराव जगदाळे यांची बिनविरोध निवड झाल्याने पक्षनिष्ठ व संयमी कार्यकर्त्याचा बहुमान झाला आहे.

उपमुख्यमंत्री तथा पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा अजित पवार यांनी पक्षाच्या वाढीसाठी पुणे जिल्हा परिषद सभागृहातील अनुभवी सदस्य तथा दिवंगत अजित पवार यांचे विश्वासू सहकारी असलेले वीरधवल जगदाळे यांना अध्यक्षपदावर काम करण्याची संधी दिली आहे. दौंड तालुक्याला १९ वर्षानंतर पुन्हा अध्यक्षपद मिळाले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com