ZP School : झेडपी शाळांमध्ये आता पाच परकीय भाषांचे धडे; २१८ शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार उपक्रम

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच परकीय भाषांची ओळख होणार.
Pune Rural zp school

Pune Rural zp school

sakal

Updated on

- नरेंद्र साठे

पुणे - ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना आता जर्मन, फ्रेंच, स्पॅनिश, रशियन आणि जपानी या पाच परकीय भाषांची ओळख होणार आहे. गेल्या वर्षी दोन भाषांपासून सुरू झालेल्या या उपक्रमाचा यंदा विस्तार करण्यात आला आहे. १०२ वरून २१८ शिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रशिक्षित शिक्षक आपल्या शाळांमधील विद्यार्थ्यांना या भाषांची प्राथमिक ओळख करून देणार आहेत. त्यामुळे विद्यापीठातील परकीय भाषा विभागाकडून सुरू झालेले प्रशिक्षण थेट ग्रामीण शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com