पुणे - जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाइन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायाचा विचार सध्या सुरू आहे. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती. मात्र, त्यात आता बदल करून मोबाइलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतर हजेरी लावता येणार आहे.