Flight Cancelled : तीन तासांची प्रतीक्षा अन् विमान रद्द
Air India Delay : झ्युरिचला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना साडेतीन तास विमानातच थांबवून उड्डाण रद्द करण्यात आले, यामुळे प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली.
पुणे : दिल्लीहून झ्युरीचला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे उड्डाण तांत्रिक बिघाडामुळे ‘टॅक्सी वे’वर रद्द करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी प्रवाशांना विमानात तीन ते साडेतीन तास बसविल्यानंतर कोणतेही कारण न सांगता ही घोषणा झाली.