Premium|Thinking in Bets book lessons : "चांगला निर्णय अन् थोडे नशीब..." 'थिंकिंग इन बेट्स'च्या आधारे धनंजयराव-छोटूचा रंजक संवाद

Poker Strategies Applied to Business Management : अ‍ॅनी ड्यूक यांच्या ‘थिंकिंग इन बेट्स’ या पुस्तकावर आधारित धनंजयराव आणि छोटू यांचा पत्त्यांच्या खेळातील दिलखुलास संवाद. चांगला निर्णय आणि नशीब यांच्या बेरजेतून व्यवसायात मिळणाऱ्या यशाचे रंजक विश्लेषण.
Poker Strategies Applied to Business Management

Poker Strategies Applied to Business Management

esakal

Updated on

विक्रम अवसरीकर - vikram.awsarikar@gmail.com

‘‘चांगला परिणाम हा चांगली निर्णयप्रक्रिया आणि थोडे नशीब यांची बेरीज असते. शक्यतो निर्णय घेण्याची सुरुवात करताना अतिशय स्पष्टपणे विचार केला पाहिजे. खुलेपणाने सगळ्या शक्यतांचा विचार करून मगच कृती केली पाहिजे...’’ हा संदेश देणारा धनंजयराव आणि छोटू यांचा हा दिलखुलास संवाद. हा संवाद व्यावसायिक पोकर खेळाडू आणि व्यवस्थापन रणनीतिकार असलेल्या अ‍ॅनी ड्यूक या लेखिकेच्या ‘थिंकिंग इन बेट्स’ या पुस्तकावर आधारित आहे.

धनंजयराव आणि छोटू नुकतेच एका अवघड प्रकरणाचा तपास संपवून परत आले होते. जिवावर खेळून त्यांनी भारताच्या विरुद्ध असणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला पकडून दिले होते. त्या विजयामुळे वातावरण आनंदी होते. दोघेही थंड कॉकटेल आणि गरमगरम कोळंबी खात पत्ते खेळत होते. सात-आठ या खेळात धनंजयराव स्वयंघोषित जगज्जेते होते. त्यांना कोणीही हरवू शकत नाही, असा त्यांचा दावा होता. छोटूला अर्थात तो खोडून काढायचा होता. धनंजयरावांच्या स्लेजिंगला न घाबरता तो इरेला पेटून खेळत होता.

‘‘ही घे हुकमाची दश्शी...’’ बदाम दश्शी टाकत धनंजयराव म्हणाले.

छोटू विचारात पडला. त्याने मनातल्या मनात गणित केले. धनंजयरावांकडे न उलटलेली दोन पाने होती. त्यातल्या एका पानातच राहिलेला बदाम गोटू होता. छोटूच्या हातात बदाम राजा आणि बदामचीच अठ्ठी होती. बदाम एक्काही न उलटलेल्या पानात कुठेतरी असेल अशी त्याला आशा होती. निदान राजाचा एक हात तरी आपला आहे अशी त्याची खात्री होती. बदाम दश्शी धनंजयरावांनी टाकल्यामुळे बदाम गोटू त्यांच्या हातात नाही, असे गृहीत धरून त्याने राजाचा हात घेतला; पण धनंजयरावांच्याच हातात बदाम गोटू आणि बदाम एक्का निघाला आणि छोटू वाईट रीतीने हरला.

‘‘हे काय? तुमच्या हातात गोटू असताना तुम्ही दश्शी का टाकली? त्यामुळे मी गंडलो आणि मला वाटले, की गोटू तुमच्याकडे नाही आणि मी त्याप्रमाणे खेळलो...’’ छोटूने हरल्यावर नेहमीप्रमाणे कारणे देणे चालू केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com