शेअर बाजार : अदानी एनर्जी सोल्युशन्स

कन्सॉलिडेशन झोनमधून वेज ब्रेकआऊट; अदानी एनर्जी सोल्युशन्सचा शेअर १४२० वर, पुढील दीड-दोन वर्षांत ४२०० रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
From Power Transmission to Smart Metering: Adani’s Strategic Expansion Plans

From Power Transmission to Smart Metering: Adani’s Strategic Expansion Plans

Sakal

Updated on

मकरंद विपट, ‘सेबी’ रजिस्टर रिसर्च ॲनालिस्ट

अदानी पोर्टफोलिओचा भाग असलेली अदानी एनर्जी सोल्युशन्स लि. (AESL) ही ऊर्जा क्षेत्रातील वीज पारेषण, वितरण, स्मार्ट मीटरिंग आणि कुलिंग सोल्यूशन्स यांसारख्या विविध विभागात काम करणारी कंपनी आहे. ‘एईएसएल’ ही भारतातील सर्वांत मोठी खासगी पारेषण कंपनी आहे. कंपनीकडे ४८५ चौरस किलोमीटरचे वीज वितरण जाळे असून, ते महानगर मुंबई आणि मुंद्रा एसईझेड या औद्योगिक केंद्रातील १.२ कोटींहून अधिक ग्राहकांना सेवा पुरवते. कंपनीने तीन नव्या क्षेत्रांमध्ये परवान्यांसाठी अर्ज केला आहे, ज्यात मुंबई आणि मुंद्रा ‘एसईझेड’मधील विद्यमान डिस्कॉमजवळची नवी मुंबई आणि कच्छ; तसेच पश्चिम उत्तर प्रदेशमधील गाझियाबाद ते जेवर-बुलंदशहर यांचा समावेश आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com