
AI Impact On Employment 2025: आयटी क्षेत्रात सतत नोकऱ्यांची कपात होताना दिसत असते. पण सध्या तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे याचे प्रमाण वाढले आहे. अनेक मोठमोठ्या आयटी कंपन्या जसे की ऍमेझॉन, गुगल, फ्लिपकार्ट, इत्यादी बऱ्याचदा काही प्रमाणात कामगारांना काढून टाकत असतात.
नुकतीच मायक्रोसॉफ्टनेदेखील सुमारे ६,७०० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आणि आता IBM नेही सुमारे ८,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या कपातीचा सर्वाधिक परिणाम कंपनीच्या ह्युमन रिसोर्स म्हणजेच एचआर विभागावर (HR Department) झाला आहे.
IBM ने अलीकडेच काही ठराविक कामांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर सुरू केला आहे. HR विभागात ज्या कामांमध्ये माहिती व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांच्या शंका निवारण, कागदपत्रांची पूर्तता यांसारखी रोजची, ठरलेली कामं येतात, ती आता AI सॉफ्टवेअर करू लागलं आहे. या बदलामुळे जवळपास २०० HR पदं आधीच AI ने घेतली असून, आता अधिक मोठ्या प्रमाणावर नोकरकपात झाली आहे.
कंपनीच्या म्हणण्यानुसार, AI चा वापर केल्याने वेळ आणि खर्च वाचतो, आणि ही बचत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, मार्केटिंग, विक्री यांसारख्या इतर महत्त्वाच्या विभागांत गुंतवली जात आहे. त्यामुळे एकीकडे काही नोकऱ्या कमी होत असल्या, तरी दुसऱ्या बाजूला नवीन संधीही निर्माण होत आहेत.
IBM चे CEO अरविंद कृष्णा यांनी स्पष्ट केलं की, “AI आणि ऑटोमेशनमुळे काही विभागात कामकाज अधिक वेगवान आणि कार्यक्षम झालं आहे. पण एकूण कंपनीतील कर्मचारीसंख्या वाढली आहे, कारण बचतीतून इतर ठिकाणी भरती केली जात आहे.”
IBM च्या HR विभागप्रमुख निक्की लॅमोरो यांचा यावर वेगळा दृष्टिकोन आहे. त्यांचं म्हणणं आहे, “AI मुळे सगळ्याच नोकऱ्या जात नाहीत. केवळ रोजची पुन्हा पुन्हा होणारी कामं AI करतंय, त्यामुळे माणसांना अधिक महत्त्वाचं आणि निर्णयक्षमतेचं काम करण्यासाठी वेळ मिळतो.”
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.