

Artificial Intelligence: Boon and Bane of the Digital Age
esakal
सायबर सुरक्षा, अतुल कहाते तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक -विश्लेषक
मराठीत ‘काट्याने काटा काढणे’ अशी एक म्हण आहे. आज जगभर गाजत असलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान अर्थात ‘एआय’बाबत ही म्हण अगदी लागू होते. कारण ‘एआय’चा उपयोग जितका चांगल्या कामासाठी होऊ शकतो, तितकाच तो गैरवापरासाठीही होत आहे. काही लोक ‘एआय’च्या मदतीने खोटा बायोडेटा तयार करतात. कोणत्याही कामाचा अनुभव नसताना अनुभव असल्याचे दाखवतात. काही जण अपघाती विम्याचा परतावा मिळवण्यासाठी अपघात किंवा नुकसान झाल्याची बनावट छायाचित्रे तयार करतात. काही जण बँकेत खाते उघडण्यासाठी बनावट पॅन कार्ड, आधार कार्ड तयार करतात. पासपोर्टसाठीही खोटी कागदपत्रे बनवली जात आहेत.