फिनटेक : ‘ओपन एआय’चा आयटी बॉम्ब

ओपन एआयच्या नव्या घोषणांनी भारतीय आयटी क्षेत्रातील पारंपरिक ‘कमी खर्चातील कुशल मनुष्यबळ’ मॉडेलला धक्का; निफ्टी आयटी निर्देशांकात तीव्र घसरण, मोठ्या संरचनात्मक बदलाची चाहूल
Tech Disruption: OpenAI’s Advanced Models Trigger Heavy Sell-off in Indian IT Stocks

Tech Disruption: OpenAI’s Advanced Models Trigger Heavy Sell-off in Indian IT Stocks

Sakal

Updated on

अतुल कहाते, तंत्रज्ञान विषयाचे अभ्यासक-विश्‍लेषक

जागतिक तंत्रज्ञान क्षेत्रात चॅट जीपीटीवाल्या ‘ओपन एआय’ कंपनीने केलेल्या नव्या घोषणांमुळे भारतीय शेअर बाजारात, विशेषतः आयटी क्षेत्रात, मोठी अस्थिरता निर्माण झाली आहे. ‘ओपन एआय’ने केवळ भाषिक मॉडेलवर न थांबता व्यावसायिक स्वरूपांच्या सेवा देण्यास सुरुवात केली आहे. याचा थेट आणि तात्काळ परिणाम भारतीय आयटी कंपन्यांच्या शेअरवर दिसून येतो. ‘निफ्टी आयटी’ इंडेक्स दणादण आपटताना दिसतो. बाजारातील ही घसरण केवळ तात्पुरती प्रतिक्रिया नसून, एका मोठ्या बदलाची नांदी मानली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com