

डॉ. दिलीप सातभाई - चार्टर्ड अकाउंटंट- सीए
आपले उत्पन्नच करपात्र नाही, तर करविवरणपत्र कशाला भरायचे अशी सोयीस्कर समजूत करून घेऊन अनेक करदाते विवरणपत्र भरण्यापासून पळवाट शोधतात. मात्र, ही पळवाट काही वेळेला नुकसानदायक ठरते. कारण नियमित प्राप्तिकर विवरणपत्र भरलेले असणे अनेक आर्थिक व्यवहारांसाठी आवश्यक असते. योग्य प्रकारचे विवरणपत्र भरणेदेखील महत्त्वाचे असते. करसवलत मिळण्यासाठी विवरणपत्र भरणे अनिवार्य आहे, त्यामुळे सध्या विवरणपत्र भरण्यासाठीची अंतिम मुदत जवळ येत असताना काळजीपूर्वक विवरणपत्र भरणे आवश्यक आहे.