
सध्या ‘आयुष्मान भारत’ योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळतात. तथापि, त्यासाठी काही अटी व निकष होते, त्यामुळे सर्व आर्थिक स्तरावरील ज्येष्ठ नागरिकांना ही सुविधा उपलब्ध नव्हती.
या योजनेचा विस्तार करत आणि जुन्या अटी दूर करत केंद्र सरकारने नुकताच ७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा त्यांचा कोणतीही आर्थिक, सामाजिक वा उत्पन्न पातळीचा वा राहणीचा विचार न करता या योजनेअंतर्गत आरोग्य विमा सुरक्षा प्रदान करीत समावेश केला आहे.
त्यामुळे त्यांना मान्यताप्राप्त रुग्णालयात वार्षिक पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.