
Which States Have Bank Holidays on Eid Ul Adha: बकरी ईद किंवा ईद-उल-अजहा हा इस्लाम धर्मातील एक पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी प्रेषित इब्राहीम यांनी अल्लाहच्या आज्ञेप्रमाणे आपल्या पुत्राची बलिदान देण्याची तयारी दाखवली, याची आठवण म्हणून हा सण साजरा केला जातो.
याच पार्श्वभूमीवर अनेकांना प्रश्न पडतो की बँका या दिवशी देशभरात सुरु राहतील की नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या अधिकृत संकेतस्थळानुसार, 6 जून 2025 रोजी म्हणजेच शुक्रवारी, ईद-उल-अधा निमित्त भारतातील काही राज्यांतील बँका बंद राहतील.
आरबीआयच्या सुट्यांच्या यादीनुसार, ६ जून रोजी केवळ कोची आणि तिरुवनंतपुरम या दोन ठिकाणीच बँका बंद असतील. या दिवशी Negotiable Instruments Act अंतर्गत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त देशातील उर्वरित सर्व राज्यांतील बँका या दिवशी नेहमीप्रमाणे सुरु राहतील.
६ जून रोजी काही ठिकाणीच बँका बंद राहणार असल्या, तरी ७ जून रोजी देशातील अनेक राज्यांमध्ये बँका बंद असतील. फक्त अहमदाबाद, गंगटोक, ईटानगर, कोची आणि तिरुवनंतपुरम येथील बँका सुरू राहतील. ७ जून रोजी या ठिकाणांव्यतिरिक्त इतर सर्व राज्यांतील बँका बंद राहणार आहेत. कारण हा महिन्याचा पहिला शनिवार आहे.
जरी बँका काही ठिकाणी बंद असल्या, तरी ऑनलाइन बँकिंग सेवा देशभरात सुरू राहतील. ग्राहक खालील सेवा सुट्टीच्या दिवशी देखील वापरू शकतात:
- नेट बँकिंग व मोबाइल बँकिंग
बिल भरणे, पैसे ट्रान्सफर करणे (NEFT/RTGS/IMPS), खाते तपशील (Bank Statement) पाहणे यांसारख्या सेवा
- डिमांड ड्राफ्ट व चेकबुक विनंती फॉर्म
ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध
- कार्ड सेवा
डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एटीएम कार्ड संबंधित सेवा
- स्टँडिंग इन्स्ट्रक्शन्स सेट करणे, लॉकर विनंती, खात्याच्या माहितीतील बदलासाठी आवश्यक असलेले फॉर्म सबमिट करणे