Premium|Banking Sector Challenges and Credit Risk : बँका आणि एनबीएफसींसमोर नवी आव्हाने; कर्जतोटा आणि मालमत्तेच्या गुणवत्तेवर लक्ष

Banking Sector and NBFC Credit Risk: वाढता लोन-टू-डिपॉझिट रेशो, अपेक्षित कर्जतोटा (ECL) चौकट आणि एनबीएफसी क्षेत्रातील निधी उभारणीच्या अडचणींमुळे वित्तीय संस्थांसमोर नवी आव्हाने निर्माण होत आहेत. इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे करण गुप्ता यांच्याशी झालेल्या मुलाखतीत बँका, एनबीएफसी आणि पतनिर्धारण क्षेत्राची भूमिका समजून घेता येते.
Banking Sector Challenges and Credit Risk

Banking Sector Challenges and Credit Risk

esakal

Updated on: 

उच्च लोन-टू-डिपॉझिट रेशो आणि अपेक्षित कर्जतोटा (ईसीएल) चौकटीची अंमलबजावणी यामुळेही बँकांसमोर नवी आव्हाने निर्माण होणार आहेत. दुसरीकडे, बिगर बँकिंग वित्तीय संस्था (एनबीएफसी) क्षेत्रात तारणरहित कर्ज, वाहन वित्तपुरवठा आणि निधी उभारणीतील अडचणींमुळे मालमत्तेच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व प्राप्त होऊ शकते. या पार्श्वभूमीवर, फिच ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग असलेल्या इंडिया रेटिंग्ज अँड रिसर्चचे संचालक आणि वित्तीय संस्था संशोधनप्रमुख करण गुप्ता यांची ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार वसंत कुलकर्णी यांनी खास ‘सकाळ मनी’साठी घेतलेली ही मुलाखत...

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च काय करते?

इंडिया रेटिंग्स अँड रिसर्च प्रा. लि. (इंड-रा) ही पतनिर्धारण आणि संशोधन कंपनी आहे. ती फिच ग्रुप ऑफ कंपनीजचा एक भाग आहे. भारताच्या रोखे बाजारांना अचूक, वेळेवर आणि भविष्यवेधी पतविषयक मते प्रदान करण्यासाठी ती ओळखली जाते. अर्थव्यवस्थेचे सखोल विश्लेषण, विविध उद्योगांचे पतसंशोधन आणि संतुलित दृष्टिकोन या पायावर उभारलेल्या ‘इंड-रा’ने गेल्या दशकात वेगाने वाढ केली असून, भारताच्या निश्चित उत्पन्न बाजारपेठेत लक्षणीय स्थान मिळवले आहे. ‘इंड-रा’ सध्या कॉर्पोरेट इश्युअर्स, वित्तीय संस्था (बँका आणि विमा कंपन्यांसह), फायनान्स आणि लीजिंग कंपन्या, मॅनेज्ड फंड्स, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था; तसेच स्ट्रक्चर्ड फायनान्स आणि प्रोजेक्ट फायनान्स कंपन्यांना पतविषयक सेवा प्रदान करते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com