
शिरीष देशपांडे
सध्या लग्नसराई आहे, त्यामुळे अनेकांना विविध लग्नसमारंभांसाठी निमंत्रणे येत आहेत. अलीकडच्या आधुनिक काळात लग्नपत्रिकेबरोबर व्हॉट्सॲपच्या माध्यमातूनही निमंत्रण पाठवले जाते. याचाच फायदा सायबर चोरटे घेत असून, बनावट निमंत्रणे पाठवून फसवणूक करत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या संपर्कातील लोकांच्या नावाने अथवा प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने खोटे व्हॉट्सअॅप संदेश येत आहेत.