

सुधाकर कुलकर्णी - सर्टिफाइड फायनान्शिअल प्लॅनर-सीएफपी
‘यूपीआय’ डिजिटल पेमेंट प्रामुख्याने भीम, फोनपे व गुगलपे, पेटीएम या चार मोबाईल अॅपच्या माध्यमातून होत असल्याचे दिसून येते. यातील भीम हे अॅप ‘एनपीसीआय’ने विकसित केलेले असून, ते सहा डिसेंबर २०१६ रोजी सर्वसामान्यांच्या वापरासाठी कार्यान्वीत केले. याला मिळणारा वाढता प्रतिसाद पाहून गुगल, फोनपे व पेटीएम यांनीसुद्धा आपापली ‘यूपीआय’ अॅप सुरू केली. आजही डिजिटल पेमेंटमध्ये ‘भीम’ ॲपद्वारे होणाऱ्या व्यवहारांचा हिस्सा सुमारे ३० ते ३५ टक्के आहे. ‘भीम’ ॲपची व्याप्ती वाढविण्याच्या उद्देशाने ‘एनपीसीआय’ने नुकतेच याची तिसरी सुधारित आवृत्ती दाखल केली असून, त्यात काही नव्या ग्राहकाभिमुख सुविधा देण्यात आल्या आहेत.