
डॉ. अनंत सरदेशमुख
anant.sardeshmukh@gmail.com
स्टार्ट-अप संख्या आणि गुंतवणूक या दोन्हीत महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. अगदी नावीन्यपूर्ण संकल्पनांवर आधारित नवउद्योग राज्यात उभे राहात आहेत. यामुळे अनेक गंभीर आव्हानांवर उपाययोजना उपलब्ध होत आहे. सध्या दिल्लीसह उत्तर प्रदेशाला भेडसावणाऱ्या वायू प्रदुषणावर उपयोगी ठरणाऱ्या आणि शेतकऱ्यांना उत्पन्नाचे नवे साधन उपलब्ध करू देणाऱ्या उद्योगाची पायाभरणी पुण्यातील सुहास बक्षी आणि अश्विन सावे या जोडीने ‘बायोफ्युएल सर्कल’ या कंपनीच्या माध्यमातून केली आहे.