
ॲड. रोहित एरंडे - कायद्याचे अभ्यासक
वैद्यकीय विमा दावा फेटाळला गेल्यावर विमा कंपनी आणि ग्राहक यांच्यामध्ये नेहमीच वाद होतात. विमा कंपनीची कारणे आणि ग्राहकांची स्पष्टीकरणे कधीच एकमेकांना मान्य होत नाहीत आणि मग न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतात. विमाधारकाने दारू पिण्याची सवय आणि उच्च रक्तदाब असल्याची बाब विमा कंपनीपासून लपवून ठेवली आणि या दोन्ही कारणांनी कॅन्सर (कर्करोग) होतो, अशी कारणे देत आणि कोणताही पुरावा न देता ग्राहकाचा दावा नाकारल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच विमा लोकपाल व विमा कंपनीला दणका दिला.