
मकरंद विपट - ‘सेबी’ रजिस्टर्ड रिसर्च अॅनालिस्ट
टोरेंट फार्मास्युटिकल्स लि. ही जेनेरिक फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्सच्या संशोधन, विकास, उत्पादन आणि विपणनात गुंतलेली आघाडीची भारतीय औषध कंपन्यांपैकी एक आहे. ही टोरेंट ग्रुपची प्रमुख कंपनी असून, ती वीज आणि शहर गॅस वितरण व्यवसायातदेखील कार्यरत आहे. ही कंपनी भारतीय औषध बाजारपेठेत पाचव्या क्रमांकावर आहे. तिचे ७५ टक्के उत्पन्न क्रॉनिक आणि सब-क्रॉनिक थेरपी विभागातून येते.