
कौस्तुभ केळकर,
kmkelkar@rediffmail.com
अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून नव्या वर्षात डोनाल्ड ट्रम्प कार्यभार हातात घेतील. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी लगेचच ‘ब्रिक्स’ देशांकडून होणाऱ्या आयातीवरील शुल्क वाढविण्याचे सूतोवाच केले. त्यांच्या या आक्रमक धोरणांविरुद्ध नाराजी व्यक्त होत आहे. जागतिक व्यापारात अमेरिकी डॉलरचे आजही मोठे स्थान आहे. अमेरिकेच्या दादागिरीला तोंड देण्यासाठी ब्रिक्स देशांनी ‘ब्रिक्स चलन’ आणण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे डॉलरवर काही परिणाम होईल का, याचा वेध घेण्याचा हा प्रयत्न.