
How Far Can Sensex Go? Technical Analysis of Market Waves
E sakal
BSE Sensex Forecast 2025
डॉ. किरण जाधव
kiran@kiranjadhav.com
इलियट वेव्ह सिद्धांतानुसार, शेअर बाजारातील भाव अनियमितपणे वर-खाली होत नाहीत, तर त्या एका विशिष्ट पद्धतीने लहरींच्या (waves) रुपात हलतात. प्रत्येक लहर (वेव्ह) गुंतवणूकदारांच्या सामूहिक मानसिकतेचे प्रतीक असते. त्यामुळे या वेव्हजचा अभ्यास केल्यास बाजाराची पुढील दिशा समजण्यास मदत मिळते. विविध चार्टच्या अभ्यासातून आणि माझ्या आतापर्यंतच्या अनुभवातून असे दिसून येत आहे, की आता पाचव्या वेव्हची सुरुवात आहे, जी ६५ टक्के निश्चित आहे. जर ‘बीएसई सेन्सेक्स’ने सप्टेंबर २०२४ मधील उच्चांकी पातळीच्या (साधारणपणे ८६,००० अंश) वर ब्रेकआउट दिला, तर ही पाचवी वेव्ह ‘कन्फर्म’ होईल. त्यावेळेस वेव्ह थिअरीच्या सिद्धांताप्रमाणे पुढील ५ ते ६ वर्षांत ‘बीएसई सेन्सेक्स’चे पुढील उद्दिष्ट हे साधारणपणे १,५०,००० (दीड लाख) अंश इतके असू शकेल.