Premium|Email Security : व्यवसायातील ई-मेल सुरक्षितता महत्त्वाची; सायबर गुन्हेगारांकडून गैरवापराचा धोका

Business Email Security : व्यवसायातील ई-मेल संवादासाठी अत्यावश्यक असला, तरी सायबर गुन्हेगार त्याचा वापर संगणकप्रणालीत प्रवेश मिळवण्यासाठी करतात; त्यामुळे ई-मेल सुरक्षितता आणि अंतर्गत नियंत्रण महत्त्वाचे ठरते.
Business Email Security

Business Email Security

esakal

Updated on: 

शिरीष देशपांडे - deshpande.06@gmail.com

व्यवसायांसाठी ई-मेल हा आजच्या डिजिटल युगातील अत्यावश्यक संवादाचा भाग आहे. मात्र, हेच माध्यम सायबर गुन्हेगारांसाठी कंपनीच्या संगणकप्रणालीत प्रवेश करण्याचे प्रभावी साधन ठरू शकते. त्यामुळे ई-मेलच्या वापराबरोबरच त्याची सुरक्षितता आणि अंतर्गत नियंत्रण यांनाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे.

सध्याच्या संगणक युगात व्यवसायासाठी ई-मेलचा वापर अपरिहार्य झाला आहे. ई-मेलमुळे तत्काळ पत्रव्यवहार करता येतो आणि आवश्यक ती माहिती जगाच्या कोणत्याही भागात सहज पाठवता येते. ई-मेल सेवा देणाऱ्या कंपन्या त्यांच्या डोमेनशी जोडलेले ई-मेल पत्ते उपलब्ध करून देतात. उदा. जीमेल, याहू आदी. त्याचप्रमाणे एखादी खासगी कंपनी आपल्या अधिकृत वापरकर्त्यांसाठी स्वतःच्या डोमेनवर ई-मेल पत्ते तयार करू शकते. अशा प्रकारे ई-मेल ही व्यक्ती, संस्था आणि जगभरातील इतर व्यक्ती किंवा संस्थांना संवादाच्या माध्यमातून जोडणारी महत्त्वाची यंत्रणा आहे. ई-मेलमध्ये संलग्न (अटॅचमेंट) करून विविध प्रकारची कागदपत्रे पाठवता येतात. आजच्या काळात ई-मेल हा संपर्क साधण्याचा सहजसोपा मार्ग झाला आहे. याचाच फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. ई-मेलचा वापर करून ते व्यक्ती आणि व्यवसायांना लक्ष्य करत आहेत. त्यासंदर्भातील दोन उदाहरणे पाहू.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com